अॅडिलेड- भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या चार कसोटी मालिकांमधला पहिला सामना अॅडिलेड इथल्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. १३७ धावांवर ६ गडी बाद अशी स्थिती सध्या भारताची आहे. अवघ्या २० धावांच्या आतच भारताच्या सलामीच्या फलंदाजासह तिघे माघारी परतले. के. एल. राहुल प्रथम बाद झाला. जोश हेजलवुडने त्याला बाद केले.
सुरुवातीलाच झटका बसल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला आहे. मिचेल स्टार्कने भारताचा दुसरा सलामीवीर मुरली विजयला ११ धावांवर बाद केले. पॅट कमिन्सनेकर्णधार विराट कोहलीला बाद केले. अजिंक्य रहाणेची विकेट हेजलवूडन टिपली.