लंडन-भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या ३ एकदिवसीय मालिकेतील पहिला सामन्यात रोहित शर्माने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने ८ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान आज दुसरा सामना असून यात विजय मिळवून मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला मिळालेले २६९ धावांचे आव्हान रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या शतकी भागीदारीमुळे सहज झाले.
कुलदीप यादवच्या फिरकीसमोर इंग्लंडचा संघ पुरता कोलमडला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय फिरकीपटूंना खेळण्यासाठी इंग्लंड नेमकं काय रणनिती आखतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड व भारत या दोन्ही संघांनी आज आपल्या संघात बदल केलेले नाहीयेत.