लंडन-भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे दमदार पुनरागमन केले आहे. हार्दिक पांड्याने पहिल्या डावात इंग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडत भारताचे सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारताने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद १२४ धावांपर्यंत मजल मारली. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. सध्या भारताकडे २९२ धावांची भक्कम आघाडी आहे.
दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत इंग्लंडने संयमी खेळ करत बिनबाद ४६ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र उपहारानंतर कूक (२९) आणि जेनिंग्स (२०) दोघेही बाद झाले. पुढे इंग्लंडच्या डावाला स्थैर्य मिळत असल्याचे वाटत असतानाच नवोदित ओली पोप बाद झाला. यानंतर इंग्लंडचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत गेले. दरम्यान दुसऱ्या दिवशीच्या खेळात तब्बल १२ विक्रमांची नोंद करण्यात आली.