भारत वि. इंग्लंड: इंग्लंडच्या सलामीवीरांची मोठी भागीदारी

0

बर्मिंगहॅम : विश्वचषक २०१९ च्या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असलेला भारतीय संघाचा आज यजमान इंग्लंडशी सामना सुरु आहे. भारताने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांकडून चिवट खेळ सुरु आहे. भारतीय गोलंदाजांना आतापर्यंत एकही विकेट घेता आलेली नाही. इंग्लंडच्या सलामीवीरांनी मोठी भागीदारी केली आहे. 16 षटकांचा सामना झाला असून आतापर्यंत ११२ धावा इंग्लंडने चोपले आहे. जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टोकडून जोरदार खेळी सुरु आहे. भारतीय गोलंदाज विकेटच्या शोधात आहे, परंतु त्यात सध्या तरी यश येताना दिसत नाही.