तॉरुंगा : न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्याच्या टी-२० मालिकेत भारताने आतापर्यंत ४-० अशी आघाडी घेतली आहे. अतिशय अविस्मरणीय अशी ही मालिका ठरली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या दोन्ही सामन्यात सुपर ओव्हरची लढत झाली. यात टीम इंडियाने विजय संपादन केले. दरम्यान आज शेवटचा सामना होत आहे. हा सामना जिंकून न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत व्हाइट वॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. भारतीय संघाचा प्रचंड आत्मविश्वास वाढला असून न्यूझीलंड संघ प्रचंड दबावात असणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज टीम इंडियाची सुरुवातच डळमळीत झाली. संजू सॅमसन दोन धावांवर बाद झाला.