हार्दिक पांड्याची अफलातून कामगिरी; हवेत झेपावत घेतला कॅच !

0

माऊंट मोनगानुई- भारत विरुद्ध न्यूझीलंड संघादरम्यान एकदिवसीय मालिका सुरु आहे. आज तिसरा एकदिवसीय सामना आहे. नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करत आहे. दरम्यान आजच्या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे कौतुक होत आहे. हार्दिक पांड्याने आजच्या सामन्यात अफलातून झेल टिपला आहे.

सामन्याच्या १७ व्या षटकाची गोलंदाजी युजवेंद्र चहल करत होता. दुसऱ्या चेंडूवर केन विलियम्सन मारलेला फटका मिडविकेटला उभ्या असलेल्या पांड्याने अप्रतिमरित्या टिपला. हवेत उडी घेत पांड्याने ही कॅच घेतला. त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय संघ विशेषत: कर्णधार विराट कोहली जाम खुश झाला.

कॉफी विथ करणच्या कार्यक्रमातील विधानामुळे हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल देशभरात चर्चेत आले होते. त्यांच्यावर निलबंनाची कारवाई करण्यात आली होती. पुन्हा हार्दिक पांड्याचे पुनरागमन झाले.