मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा दोन्ही देशांतील चाहत्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो आणि तेवढाच उत्सुकतेचा देखील असतो. दोन्ही देशाची प्रतिष्ठा यावर अवलंबून असते. भारत-पाक यांच्यातील सामन्याचा आनंद पुन्हा चाहत्यांना लुटता येणार आहे. 9 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या महिलांच्या ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा वेस्ट इंडिज येथे खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर येणार आहे. 11 नोव्हेंबरला भारत-पाक सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर होणार आहे.
भारतीय संघाचा ब गटात समावेश करण्यात आला असून त्यांच्यासमोर पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आयर्लंड यांचे आव्हान असणार आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पाहत आहे. भारतीय महिलांनी सराव सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिज संघाला पराभवाची चव चाखवली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंचे मनोबलची उंचावले आहे.