भारत वि पाक सामना; रोहित शर्भा, लोकेश राहुलची दमदार सलामी

0

मँचेस्टर: आज भारताचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाशी वर्ल्डकप स्पर्धेत सामना सुरु आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची दमदार सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल सलामीला आहे. दोघांनी पाकिस्तानच्या गोलंदाजाची धुलाई सुरु केली आहे. रोहित शर्माने अर्ध शतक झळकविले आहे. तर लोकेश राहुल 28 धावांवर खेळत आहे. १३ षटकात भारतीय संघाने ८० धावा केल्या आहे.

गेल्या आठवड्याभरात मँचेस्टरमध्ये पाऊस पडलेला आहे, त्यामुळे भारत-पाक सामन्यावरही पावसाचे सावट होते. याआधी विश्वचषकातले ४ सामने पावसामुळे वाया गेले आहेत. मात्र शनिवारी रात्री उशीरा, या सामन्यावरचं पावसाचं संकट कमी झाल्याची बातमी समोर आली आहे. आज सकाळपासून मँचेस्टरमधलं वातावरण पुन्हा एकदा ढगाळ झालेलं आहे, मिळालेल्या माहितीनुसार सामन्याच्या मध्येच पावसाच्या हलक्या सरी येण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे वरुणराजाने आजच्या दिवशी उसंत घ्यावी अशी प्रार्थना सर्व क्रिकेटप्रेमी करत आहेत.