मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला चौथा वन-डे सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या संपूर्ण मालिकेत चमकदार कामगिरी करणारा भारतीय कर्णधार विराट कोहली आज लवकर बाद झाल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. विराट कोहली १६ धावा काढून बाद झाला. आता सध्या भारताची स्थिती ११३ धावांवर दोन गडी बाद अशी आहे. रोहित शर्मा आणि अंबाती रायडू धावपटीवर आहे.