अँटिगा: वन-डे मालिकेनंतर आजपासून भारतीय संघाचे वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजेपासून सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात सर्वाधिक लक्ष लागले आहे ते भारतीय संघाचे कर्णधार विराट कोहली याच्याकडे. पहिला कसोटी सामना जिंकल्यास कर्णधार म्हणून त्याला कसोटीचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या २७ विजयांशी बरोबरी करण्याची संधी असेल तर या सामन्यात त्याने शतकी खेळी केली तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या १९ शतकांशी त्याला बरोबरी करता येईल.
असे आहेत दोन्ही संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, ऋषभ पंत, कुलदीप यादव, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बूमराह, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा.
वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शमारा ब्रूक्स, जॉन कॅम्प्बेल, रोस्टन चेस, रखीम कॉर्नवॉल, शेन डॉरिच, शेनॉन गॅब्रिएल, शिमरॉन हेटमायर, शै होप, कीमो पॉल, केमार रोच.