गयाना: वेस्ट इंडीज विरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघ वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना आज प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघात केदार जाधव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी हे परतणार आहेत.
असा आहे भारतीय संघ
विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी
असा आहे वेस्ट इंडिजचा संघ
जेसन होल्डर ( कर्णधार), जॉन कॅम्बेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, रोस्टोन चेस, फॅबियन अॅलन, कार्लोस ब्रॅथवेट, किमो पॉल, ख्रिस गेल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, शे होप, केमार रोच