वेस्ट इंडिजला नमविण्यासाठी भारतीय संघाकडून जोरदार सराव

0

नवी दिल्ली- भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात २१ ऑक्टोंबर पासून एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. पाहुण्या संघाला धोबीपछाड देण्यासाठी भारतीय संघाकडून जोरदार सराव केला जात आहे. कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता एकदिवसीय मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर कसोटीतील पराभवाचा वचपा काढण्याचे लक्ष वेस्ट इंडीज संघासमोर असणार आहे.

भारतीय संघ जोरदार सराव करीत असून सरावा दरम्यानचे फोटो खुद्द कर्णधार विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

 

https://www.instagram.com/p/BpGk7y4nYDZ/?taken-by=dhoniofficial7