भारत वि वेस्ट इंडीज: आज शेवटचा सामना !

0

त्रिवेंद्रम : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वन-डे मालिकेतील आज शेवटचा आणि पाचवा वन-डे सामना आज त्रिवेंद्रम येथे खेळवण्यात येणार आहे. भारताने या अगोदर ४ पैकी २ सामने जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. आज सामना जिंकून मालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न भारतीय संघ करणार आहे तर सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविण्याचा प्रयत्न वेस्ट इंडीज संघाचा असणार आहे. झालेल्या चार सामन्या पैकी २ सामने भारताने तर १ सामना वेस्ट इंडीज संघाने जिंकले आहे. एक सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.