विशाखापट्टणम- भारत आणि विंडीज यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. विशाखापट्टणम येथे आज हा सामना होत आहे. भारताने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सुरुवात निराशाजनक झाली आहे. शंभरीचा टप्प्या ओलांडण्याआधीच भारताचे दोन गडी तंबूत परतले आहे. रोहित शर्मा व शिखर धवन बाद झाले आहे. दरम्यान आता कर्णधार विराट कोहली आणि अंबाती रायडू मैदानावर आहेत त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
सध्या भारताची ११८ वर दोन गडी बाद अशी अवस्था आहे.