10 गडी राखून भारताचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय

0

हैद्राबाद-भारत आणि वेस्ट इंडीज संघात कसोटी सामने खेळले गेले. यात पहिली कसोटी भारताने जिंकली होती. दुसरी कसोटी देखील भारताने जिंकली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आज भारताने १० गडी राखत वेस्ट इंडीज संघावर दणदणीत विजय मिळविला. विजयासाठी भारताला ७२ धावांची आवश्यकता होती. भारताच्या प्रथम जोडीने १६ व्या षटकात ७२ धावा ठोकून विजय मिळवून दिला. पृथ्वी शॉला १२ धावांवर असताना जीवदान मिळाला. जलदगती गोलंदाज उमेश यादवने दुसऱ्या कसोटीत दमदार कामगिरी केली, त्याने १० विकेट घेतले आहे.