कोहली, धोनीने सावरले; भारताचे इंडीजसमोर 268 धावांचे आव्हान

0

इंडीज संघाच्या भेदक गोलंदाजीमुळे मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश; कोहली, धोनीने सावरले

मँचेस्टर: विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी 27रोजी भारत विरुद्ध वेस्ट इंडीज अशी लढत झाली. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर हा सामना झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला हा निर्णय चुकल्याचे दिसून आले. कारण सुरुवातीलाच 6 व्या षटकातच भारताला रोहित शर्माच्या रूपाने पहिला धक्का बसला. 18 धावा करून रोहित शर्मा बाद झाला. परंतु शेवटी सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने 7 गडी गमवीत 267 धावसंख्या उभारत इंडीज संघासमोर 268 धावांचे आव्हान ठेवले.

वेस्ट इंडीज संघाच्या गोलंदाजांनी एकेक धावांसाठी भारतीय फलंदाजांना झिजविल्याचे दिसून आहे. कर्णधार विराट कोहली 72, महेंद्रसिंह धोनीने 56 धावा केल्याने संघाला आधार मिळाला. भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता येत नव्हती, अखेर पंड्याची फटकेबाजीमुळे भारत सुस्थितीत आला. केमर रोचने केलेल्या भेदक गोलंदाजी करत 10 षटकात 36 देत 3 बळी टिपल्या.

२०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आजपर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आतापर्यंत एकही सामने भारतीय संघाने गमविले नाही. पाच सामन्यांत चार सामन्यात विजय मिळवून भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे. 1996 च्या वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाने विंडीजविरुद्धी विजयी परंपरा कायम राखली आहे. भारताचा हा विजयी रथ रोखण्यासाठी इंडीज संघाने पुरेपूर प्रयत्न केले. वेस्ट इंडिजला सहा सामन्यांत फक्त एकच विजय मिळवता आला असून चार पराभव आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या गेल्या सामन्यात कालरेस ब्रेथवेटने वेस्ट इंडिजला अनपेक्षित असा विजय मिळवून देण्याकडे कूच केली होती. मात्र षटकारांची आतषबाजी करणाऱ्या ब्रेथवेटची शतकी झुंज अखेर पाच धावांनी व्यर्थ ठरली होती.

असे होते दोन्ही संघ
भारतीय: विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, रोहित शर्मा, विजय शंकर, एमएस धोनी, केदार जाधव, हार्डिक पंड्या, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युजेंद्र चहल, जसप्रित बुमरा

वेस्ट इंडीज:
जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, सुनील एम्ब्रिस, शाई होप, निकोलस पूरान, शिम्रॉन हेटमीर, कार्लोस ब्रॅथवाइट, फैबियन ऍलन, केमर रोच, शेल्डन कॉटरेल, ओशन थॉमस

संक्षिप्त धावफलक
विराट कोहली 72, रोहित शर्मा 18, लोकेश राहुल 48, विजय शंकर 14, केदार जाधव 7, हार्दिक पंड्या 46, कुलदीप ०, धोनी 56 नाबाद, शमी नाबाद ०