नवी दिल्ली: भारतीय संघाला ऑक्टोबर महिन्यात मैदानावर वेस्ट इंडिजशी सामना करायचा असून या इंग्लंड दौऱ्यात भारत वेस्ट इंडिजविरुद्ध २ कसोटी, ५ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहेत. दोन कसोटी सामन्यांसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने आपला १५ जणांचा संघही जाहीर केला आहे.
इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ आशिया चषकासाठी युएईला रवाना होईल. या स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहचल्यास (२८ सप्टेंबर) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी तयार व्हायला भारताकडे अवघे ५ दिवस शिल्लक राहणार आहेत. आज वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे.
असे आहे वेळापत्रक
पहिली कसोटी : ४ ते ८ ऑक्टोबर (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, राजकोट)
दुसरी कसोटी : १२ ते १६ ऑक्टोबर (राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद)
वन-डे मालिका –
पहिला वन-डे सामना : २१ ऑक्टोबर (बारसपारा मैदान, गुवाहटी)
दुसरा वन-डे सामना : २४ ऑक्टोबर (होळकर मैदान, इंदूर)
तिसरा वन-डे सामना : २७ ऑक्टोबर (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे)
चौथा वन-डे सामना : २९ ऑक्टोबर (वानखेडे मैदान, मुंबई)
पाचवा वन-डे सामना : १ नोव्हेंबर (ग्रिनफिल्ड मैदान, थिरुअनंतपुरम)
टी-२० मालिका –
पहिला टी-२० सामना : ४ नोव्हेंबर (इडन गार्डन्स, कोलकाता)
दुसरा टी-२० सामना : ६ नोव्हेंबर (कानपूर/लखनऊ)
तिसरा टी-२० सामना : ११ नोव्हेंबर (चेपॉक मैदान, चेन्नई)