भारत वि.न्यूझीलंड: एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी सुरुवात !

0

नेपियर: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज पहिला एकदिवसीय सामना झाला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंड संघ तग धरू शकला नाही. न्यूझीलंड संघाला फक्त १५६ धावांपर्यंत मजल मारता आली. १५६ धावांचे माफक आव्हान भारतीय संघाने ८ गडी राखून पूर्ण केले. त्यामुळे पाच सामन्याच्या मालिकेत भारताने विजयी सुरुवात करत १-० अशी आघाडी घेतली आहे.

शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीला रोहित शर्मा व विराट कोहली यांची मिळालेली साथ यामुळे भारताने १५६ धावांचे सुधारित लक्ष्य सहज पार केले. भारताकडून कुलदीप यादवने प्रभावी कामगिरी केली. त्याने ४ गडी बाद केले. मोहम्मद शमीने तीन, तर युजवेंद्र चहलने दोन विकेट घेतल्या.