मेलबर्न: भारत वि.ऑस्ट्रेलियात आज तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना झाला. यात भारताने विजय मिळवीत २-१ च्या फरकाने मालिका जिंकली. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात प्रथमच द्विदेशीय वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्याप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा मॅच फिनीशरची भूमिका बजावली. आजच्या सामन्यात युजवेंद्र चहलच्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाला केवळ २३० धावांपर्यंत मजल मारता आली. २३० धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. रोहित शर्मा (९) आणि शिखर धवन (२३) वर बाद झाले. मात्र, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीने संयमी खेळी करून संघाला सावरले. महेंद्र सिंह धोनीने दमदार कामगिरी करत ११४ चेंडूत ८७ धावा ठोकल्या. तर धोनीला केदार जाधवची साथ लाभली. केदार जाधवने ५७ चेंडूत ६१ धावा केल्या.