वेस्ट इंडीजचा मानहानीकारक पराभव; भारताने मालिका जिंकली

0

त्रिवेंद्रम-भारत आणि वेस्ट इंडीज संघात पाच एकदिवसीय सामन्याची मालिका खेळली गेली. यात भारतीय संघाने चार सामन्यापैकी दोन सामन्यात यश मिळविलेले होते. वेस्ट इंडीज संघाने एक सामना जिंकलेला होता तर एक सामना बरोबरीत सुटला होता. आज पाचवा आणि अखेरचा सामना झाला. त्यात भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडीज संघाचा टिकाव धरू शकली नाही. वेस्ट इंडीजचा पूर्ण संघ १०४ धावांवर बाद झाला. वेस्ट इंडीज संघाने दिलेले लक्ष भारतीय संघाने केवळ १५ षटकात ९ गडी राखत हे लक्ष पार करून मालिका खिशात घातली. मालिकेच्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडीज संघाचा हा मानहानीकारक पराभव आहे.

भारतीय गोलंदाजांनी सामन्याच्या सुरुवातीपासून वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना कात्रीत पकडले होते.

रवींद्र जडेजाने भेदक गोलंदाजी करत ३४ धावांच्या मोबदल्यात चार गडी बाद केले. जसप्रीत बुमराह, खलील अहमदने प्रत्येकी दोन गडी तर भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादवने प्रत्येकी १ गडी बाद केले.