विशाखापट्टणम: भारत आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध पहिला कसोटी सामना झाला. आज रविवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताने दक्षिण आफ्रिकेवर २०३ धावांनी विजय मिळविला. भारतीय संघाने विजयासाठी आफ्रिकेसमोर ३९५ धावांचा लक्ष ठेवला होता. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. मोहम्मद शमीने ५, रवींद्र जडेजाने तर अश्विनने १ गडी बाद केले.
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील हा ३५० वा बळी होता. हा बळी मिळवत अश्विनने सर्वात वेगवान ३५० बळींच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.