नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाचे शौर्य आणि पराक्रम जगभरात कौतुकाचा विषय आहे. हवाई दलाच्या पराक्रमाच्या गोष्टीने अभिमानाचा अनुभव येत असतो, अशा भारतीय हवाई दलाचा आज 88वा स्थापना दिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर हवाई दलाची ताकद पाहायला मिळाली. हिंडन एअरबेसवर चित्तथरारक प्रात्यक्षिकांचा अनुभव देशवासीयांनी घेतले. भारतीय सैन्य दलात राफेल लढाऊ विमाने महिन्याभरापूर्वीच दाखल झाल्या आहेत. राफेलमुळे भारतीय हवाई दलाची ताकद कित्येक पतीने वाढली आहे. यावेळच्या वर्धापन दिनाचे विशेष आणि खास आकर्षण राफेल आहे.
#WATCH Indian Air Force fighter jet carries out vertical charlie manoeuvre at Hindon Air Base in Ghaziabad, as IAF celebrates its 88th anniversary today.#AirForceDay2020 pic.twitter.com/K68On8puHb
— ANI UP (@ANINewsUP) October 8, 2020
भारती हवाई दलाच्या वर्धापन दिनानिमित्ताने देशभरातून विविध माध्यमांद्वारे कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यामातून हवाई दलाच्या जवानांचे अभिनंदन केले आहे. “हवाई दलाच्या दिनानिमित्त भारतीय हवाई दलाच्या सर्व शूर योद्ध्यांना शुभेच्छा!