आयपीएलच्या फायनलमध्ये इंडियन आर्मी कसणार चित्तथरारक कसरी

0

नवी दिल्ली-उद्या २८ रोजी आयपीएलचा शेवटचा सामना हैद्राबाद आणि चेन्नईच्या संघात होणार आहे. अतिशय रोमहर्षक असा हा शेवटचा सामना असणार आहे. सामना तर रंगतदार असणार आहे यात शंका नाही. परंतू हा सामना एका गोष्टीमुळे अधिकच रंगतदार होणार आहे ते म्हणजे इंडियन आर्मी देखील शेवटच्या सामन्यासाठी उपस्थित राहणार आहे.

शेवटच्या सामन्याच्या समारोप प्रसंगी भारतीय सैन्यातील जवान अतिशय चित्तथरारक कसरती करणार आहे. भारतीय सैन्यदलातील वुशू नावाचे संघ ही कसरती करणार आहे. यात मुंबईतील जिमस्टॅस्टिक संघ देखील सहभागी होणार आहे. या वेळी वुशू संघ संपूर्ण भारताला आरोग्याच्या बाबतीत ‘फिट’ राहण्याबाबत आवाहन करणार आहे.

आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात सहभागी होण्यासाठी वुशू संघ जोरदार तयारी करत आहे.