नवी दिल्ली- बॉलीवूड असो किंवा कोणत्याही क्षेत्रातील सेलिब्रेटी असोत यांच्या खाजगी आयुष्याबाबत आज काहीही गुपित राहिलेले नाही. आपल्या मनातील गोष्टी सेलिब्रेटी खुलेआम सांगतात, अशीच अगदी मनातील गोष्ट भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केएल राहुल अर्थात लोकेश राहुलने सांगितली आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रममध्ये लोकेश राहुलला बॉलीवूडमधील कोणत्या अभिनेत्रीबद्दल क्रश असल्याचे विचारण्यात आले असता, त्याने काही क्षणात मल्लाईका अरोराचे नाव घेतले.
कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या या सिझनमध्ये प्रेक्षकांना पहिल्यांदाच क्रिकेट खेळाडू पाहायला मिळाले. हार्दिक पंड्या व केएल राहुल हे दोन्ही कॉपी विथ करणच्या सेटवर आले होते.
लोकेश राहुलने या कार्यक्रमात ड्रेसिंग रूममधील त्याचा सर्वात लज्जास्पद क्षण कोणता होता हे सांगितले, हे ऐकल्यावर करणला देखील त्याचे हसू आवरत नव्हते. त्याने सांगितले की, ड्रेसिंग रूममध्ये अर्धनग्न फिरणाऱ्या क्रिकेटर्सना पाहणे माझ्यासाठी सुरुवातीला धक्कादायक होते. कारण कर्नाटक क्रिकेट बोर्डात ड्रेसिंग रुमच्या बाबतीत काही नियम आहेत. मी दक्षिणेतील कर्नाटकाच्या टीममधून आलेलो आहे, त्यामुळे माझ्यासाठी सुरुवातीला या सगळ्या गोष्टी नवीन होत्या.
कॉफी विथ करण या कार्यक्रमात लोकेश राहुलच्या मित्रांनी त्याच्या खऱ्या आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या.
सध्या अभिनेत्री मलाईका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरच्या रिलेशनमध्ये आहे, हे आता लपून राहिलेले नाही. दोघांनी देखील याबाबत स्पष्ट बोलणे सुरु केले आहे.