इम्रान खानकडून शपथ विधीसाठी भारतीय क्रिकेटरांना विशेष निमंत्रण

0

नवी दिल्ली-पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळावीत माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा तारिक-ए-इन्साफ हा पक्ष सर्वात मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे इम्रान खान पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे. ११ ऑगस्ट रोजी शपथविधी सोहळा होणार आहे. त्यासाठी त्यांनी क्रिकेट खेळाडूंना विशेष निमंत्रण पाठविले आहे. भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू ज्यांच्यासोबत इम्रान खानने क्रिकेट खेळले आहे. त्यांना शपथ विधीसाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

पंजाब सरकारचे मंत्री आणि माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे नियोजित पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीचे आमंत्रण स्विकारले आहे. त्यांनी इम्रान खान यांच्या कामगिरीचे कौतुकही करीत त्यांच्या पंतप्रधान होण्याने भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारतील असे म्हटले आहे. १९८३ मधील विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडू कर्णधार कपिल देव, महान फलंदाज सुनील गावस्कर आणि सिद्धू यांना देखील निमंत्रण पाठविले आहे.