सैनिकांच्या सुरक्षेसाठी सरकार लवकरच खरेदी करणार माईन प्रोटेक्डेट गाड्या

0

नवी दिल्ली: सुरक्षादलातील सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकार लवकरच नवीन माईन प्रोटेक्डेट गाड्यांची खरेदी करणार आहे. नक्षली भाग, जम्मू आणि काश्मीर आणि दूर्गम भागात तैनात करण्यात येणाऱ्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी अधिक सक्षम आणि सुरक्षित असणाऱ्या माईन प्रोटेक्डेट गाड्यांच्या खरेदीला मंजूरी देण्यात आलेली आहे. ६१३ कोटी ९६ लाखांचे बजेटला मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि केंद्रीय सुरक्षा दलासाठी (बीएसएफ) माईन प्रोटेक्डेट म्हणजेच स्फोटांपासून संरक्षण करणाऱ्या गाड्या, बुलेटप्रूफ जॅकेट, रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा दलासाठी (एनएसजी) १६ कोटी ८४ लाखांची तरतूद करण्यात आली असून या पैश्यांमधून रोमोटने चालणारी सात वाहने विकत घेतली जाणार आहेत.

सध्या नक्षलग्रस्त तसेच जम्मू काश्मीरमधील काही भागांमध्ये सीआरपीएफ माइन प्रोटेक्टेड व्हेइकल्स (एमपीव्ही) वापरतात. या गाड्यांमध्ये एका वेळेस सहा जवान प्रवास करु शकतात. नवीन गाड्या सुरक्षादलाच्या ताफ्यात शामील झाल्यानंतर सुरक्षादलांना नक्षलवादी तसेच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून होणाऱ्या एलईडी हल्ल्यांना अधिक सक्षमपणे उत्तर देता येणार आहे.

रिमोटने चालणाऱ्या सात आरओव्ही (रिमोटेडली ऑप्रेटेड व्हेइकल्स) एनएसजीच्या ताफ्यात सहभागी होणार आहेत. या गाड्यांच्या मादतीने इमारती, बस, मेट्रो तसेच रेल्वे स्थानकांमध्ये जवानांच्या उपस्थितीशिवाय एलईडी निकामी करता येऊ शकतील. या आरओव्ही गाड्या ४५ डिग्रीमध्ये शिड्या तसेच चढ उतार असणाऱ्या ठिकाणी ८ किलोपर्यंतचे वजन घेऊन जाऊ शकतात. या गाड्यांवर एमएमजी गन, एमपी फाइव्ह हत्यारे आणि शॉर्टगन सारखी हत्यारे लावण्याची सोय आहे. या गाड्यांवरील कॅमेरासारख्या सिस्टीमुळे गाडीच्या आजूबाजूचा परिसर रिमोटने ती चालवणाऱ्यांना थेट केबिनमध्ये दिसण्याची सोय असून यात एक्स रे स्कॅनर्सचीही सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.