संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

0

नवी दिल्ली: कोरोना महामारी लक्षात घेता संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्याच्या निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पुढील वर्षी जानेवारीत हे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अधिवेशन रद्द करण्यात यावे असे सुचविले होते. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेतील काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

सध्या महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. दोन दिवसीय हे अधिवेशन आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. हे अधिवेशन दोन आठवड्याचे घ्यावे अशी मागणी भाजपने केली होती.