१३ राज्यांमध्ये वादळासह पावसाची शक्यता

0

नवी दिल्ली :- दक्षिण भारतात पावसाने हजेरी लावली आहे. दुसरीकडे, उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम असून उकाड्यापासून दिलासा मिळेल असे चिन्ह नाही. कर्नाटकमध्ये झालेल्या पावसामुळे गेल्या २४ तासांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मान्सून महाराष्ट्र आणि गोवामध्ये लवकरच पोहोचू शकेल. तसेच पुढील दोन-तीन दिवसात त्रिपुरा, मेघालयचे भाग, पश्चिम बंगालचे हिमालयीन क्षेत्र आणि सिक्किम या ठिकाणी हजेरी लावण्याची शक्यता आहे. १३ राज्यांमध्ये वादळासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या राज्यांमध्ये वादळासह पावसाची शक्यता
हवामान खात्याने, पश्चिम बंगाल, ओरिसा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये वादळ आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. अंदमान आणि निकोबार,आसाम, मेघालय, आसाम, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तेलंगणा,रायलसीमा,आंध्र प्रदेशआणि केरळमध्येही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.