भारतीय सॉफ्टबॉल संघाच्या सरावाला सुरुवात

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसीएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या १८ वर्षाच्या आतील व पुरुष गटाच्या सराव शिबिराचे आयोजन केले आहे. संघाचे सराव शिबीर हे १६ ते २१ एप्रिल दरम्यान आयोजित केले आहे. शिबिराचे उद्घाटन कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, अरुण श्रीखंडे, भारतीय सॉफ्टबॉल संघाचे प्रशिक्षक अभिजित इंगोले आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू सुमेध तळवेलकर, गौरव चौधरी, धीरज बाविस्कर, प्रतीक देशमुख, अर्जुन राठोड प्रयत्नशील आहेत.