जम्मू- काश्मीरमधील चकमकीत भारतीय जवान शहीद

0

जम्मू: जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर आज सकाळी पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला.गोळीबार करणार्‍या पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.या चकमकीत एक भारतीय जवान शहीद झाले.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी साडेसहा वाजता पाकिस्तानी सैन्याने राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. गोळीबार करणार्‍या पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत असताना या चकमकीत जवान लान्स नायक संदीप थापा (वय 35) शहीद झाले. थापा हे देहरादूनचे असून ते 15 वर्षांपासून लष्करी सेवेत होते. ही चकमक अद्याप सुरू आहे,’ अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली.