नवी दिल्ली-कथीत भ्रष्टाचार प्रकरणात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) कार्यालयावर सीबीआयने रेड टाकली. यावेळी साईच्या संचालकांसहीत चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये दोन साईमधील कर्मचारी तर अन्य दोघांचा समावेश आहे.
दिल्लीच्या लोदी रोड भागातील क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये छापे टाकून अटकेची कारवाई करण्यात आली.
सीबीआयने कर्मचाऱ्यांच्या शोध आणि चौकशीसाठी संपूर्ण परिसराला सील करु ठेवले होते. नवी दिल्ली येथील साईच्या परिसरात सीबीआयची छापेमारी सुरुच आहे. दोन महिन्यांपूर्वी या कार्यालयातील कोणीतरी लाच घेतल्याची तक्रार केली होती. सीबीआय याच लाचखोरीच्या प्रकरणात साईच्या कार्यालयावर छापेमारी करीत आहे.