नवी दिल्ली-भारताच्या २० वर्षाखालील फुटबॉल संघाने बलाढ्य अर्जेंटिना संघाला हरवण्याची मोठी कामगिरी करून दाखविली आहे. भारतीय संघाने अर्जेंटिनाच्या संघाच्या २-१ च्या फरकाने पराभव केला.
FT: August 6, 2018. You were there when India U20 National Team beat @Argentina U20 National Team, the most successful team in @FIFAcom U20 World Cup history.
IND 2-1 ARG#INDvARG #BacktheBlue #WeAreIndia
— Indian Football Team (@IndianFootball) August 5, 2018
२० वर्षाखालील स्पर्धेमध्ये सहा वेळा विश्वविजेता राहिलेल्या अर्जेंटिना संघाला भारतीय संघाने स्पेनमधील COITF स्पर्धेमधील समान्यात धूळ चारली. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला दिपक तनगीरने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. ६८ व्या मिनिटाला अन्वर अलीने भारतीय संघाचा स्कोअरबोर्ड २-० ने आघाडीवर नेला. त्यानंतर अर्जेंटिनाचा संघ दबावामध्ये खेळताना दिसला. त्यानंतर अवघ्या चार मिनिटांनंतर अर्जेंटिनाने आपला सामन्यातील पहिला आणि एकमेव गोल नोंदवला.
भारतीय संघ या सामन्यात पहिल्या पासूनच आक्रमक पवित्रा घेताना दिसला. त्यातच पहिल्या चार मिनिटांमध्येच गोल नोंदवल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला दिसला. मधल्या फळीतील भारतीय खेळाडूंनी चांगला खेळ करत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. भारताचा गोलकिपर प्रभाकरन गील याने अर्जेंटिना संघाने केलेले अनेक प्रयत्न परतवून लावले. त्यातही ५६व्या आणि ६१व्या मिनिटाला गीलने दाखवलेल्या चपळाईमुळे अर्जेंटिना संघाला बरोबर करण्याची संधी मिळाली नाही. पाच मिनिटांच्या एक्स्ट्रा टाइममध्ये अर्जेंटिना संघाने सामना बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी केलेला प्रयत्न गोल पोस्टला लागला. भारतीय खेळाडूंनी केलेल्या आक्रमाक खेळामुळेच भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवता आला.