देशात कोरोना सुसाट; रुग्णसंख्या ४४ लाखांच्या उंबरठ्यावर

0

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज ९० हजाराच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. देशात कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे तब्बल ८९ हजार ७०६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकाच दिवसांत १११५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकू कोरोनाबाधितांचा आकडा ४३ लाख ७० हजार १२९ झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३३ लाख ९८ हजार ८४५ हजार हून अधिक झाली आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात देशात तब्बल १ हजार ५३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ७३ हजार ८९० एवढी झाली आहे.

महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचे २० हजार १३१ रुग्ण आढळले असून ३८० मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांचा आलेख चढाच आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९ लाख ४३ हजार ७७२ झाली असून मृतांचा आकडा २७,४०७ झाला.

राज्यात सध्या २ लाख ४३ हजार ४४६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.२६ असून मृत्युदर २.९ टक्के आहे. दिवसभरात १३,२३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण ६ लाख ७२ हजार ५५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.