नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने कहर माजविला आहे. भारतात कोरनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतच आहे. दररोज ९० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळू लागले आहे. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ४७ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. पार केला आहे. गेल्या २४ तासांत म्हणजे एका दिवसांत देशात ९४ हजार ३७२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एका दिवसांत १११४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिलासादायक परिस्थिती म्हणजे भारतातील रिकव्हरी रेट जगापेक्षा अधिक असून सध्या ७७.८८ टक्के रिकव्हरी रेट आहे. २०.४७ टक्के रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. सध्या ९ लाख ७३ १७५ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
India's #COVID19 case tally crosses 47 lakh mark with a spike of 94,372 new cases & 1,114 deaths reported in the last 24 hours.
The total case tally stands at 47,54,357 including 9,73,175 active cases, 37,02,596 cured/discharged/migrated & 78,586 deaths: Ministry of Health pic.twitter.com/rV5DC2mUZp
— ANI (@ANI) September 13, 2020
देशात आतापर्यंत ३७ लाख दोन हजार ५९६ जणांनी करोनावर मात केली आहे. करोनामुळे आतापर्यंत ७८ हजार ५८६ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत पाच कोटी ६२ लाख ६० हजार ९२८ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.शनिवारी देशात दहा लाख ७१ हजार ७०२ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.