भयावह: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ५० लाखांचा टप्पा ओलांडला

0

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मागील आठवड्याभरापासून दररोज ९० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ५० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. संख्या ५० लाख २० हजार ३६० एवढी झाली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. चिंताजनकबाब म्हणजे आजपर्यत तब्बल ८२ हजार ६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ तासांत देशामध्ये ९० हजार १२३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर या दिवसभरात तब्बल १२९० जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी एका दिवसात १२९० जणांच्या मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधितांची संख्यात वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती असतांना दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे ३९ लाख ४२ हजार ३६१ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या देशामध्ये ९ लाख ९५ हजार ९३३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ७८ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे, तर सध्या देशात २० टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात दररोज कोरोनाचे २० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. मंगळवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या २० हजार ४८२नव्या रुग्णांचे निदान झाले असून, ५१५ जणांचा मृत्यू झाला होता. राज्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट ७० टक्क्यांच्या जवळ आहे. तर एकूण रुग्णांची संख्या ११ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.