कोरोनाचा कहर सुरूच; देशातील संख्येने ६५ लाखांचा टप्पा ओलांडला

0

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. भारतातही कोरोनाने कहर केला आहे. दररोज ८० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्ताची संख्या ही तब्बल तीन कोटींच्या वर गेली आहे. त्यातच भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ६५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारतातील कोरोना बळीच्या संख्येने देखील एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

आज रविवारी (4 ऑक्टोबर) रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात मागील 24 तासांत 75,829 नवे रुग्ण आढळून आले आहे. तर 940 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 65 लाख 49 हजारांवर पोहोचली.

दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे भारतातील रिकव्हरी रेट देखील चांगला आहे. भारतातील रिकव्हरी रेट ८४ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आतापर्यंत ५५ लाख ९ हजार ९६६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या ९ लाख ३७ हजार ६२५ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. आतापर्यंत कोरोनाने १ लाख १ हजार ७८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना चाचणीची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. मागील २४ तासात ११ लाख ४२ हजार १३१ कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 75,829 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल आणि आसाममध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून सण उत्सव असल्याने येत्या काही दिवसांत कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आता समोर आली आहे.