नवी दिल्ली- आज देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे. भारतीय राजकारणातील एक मजबूत आणि धैर्यवान महिला म्हणून इंदिरा गांधी यांची ओळख आहे. केवळ राजकीय जीवनात त्यांची दृढता दिसून आली असे नाही तर व्यक्तिगत जीवनात देखील त्या मजबूत आणि दृढ होत्या. हे गुण इंदिरा गांधी यांना वडिलांकडून मिळाले होते. त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर विविध चित्रपटाच्या माध्यमातून देखील प्रकाश टाकले गेले आहे.
त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचा आढावा
आंधी (१९७५)
1975 मधील गुलजार दिग्दर्शित ‘आंधी’चित्रपट आज देखील प्रसिद्ध आहे. या चित्रपटामुळे इंदिरा गांधी यांच्यावर खूप टीका झाली त्यामुळे त्यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याचे आदेश दिले. या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका सुचित्रा सेन यांनी साकारली होती. संजीव कुमार देखील मुख्य भूमिकेत होते.
किस्सा कुर्सी का (1977)
इंदिरा सरकारने आणीबाणी लागू केली होती. त्यादरम्यान अनेक चित्रपटांवर बंदी लादण्यात आली होती. त्यात एक चित्रपट किस्सा कुर्सी का (१९७७)हा देखील होता. या चित्रपटात शबाना आजमी, उत्पल दत्त आणि राज बब्बर मुख्य भूमिकेत होते.
अमु (2005)
शोनाली बोस दिग्दर्शित ‘अमु’ हा चित्रपट २००५ आला होता. कोंकणा सेन शर्मा, वृंदा करात आणि अंकुर खन्ना यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. १९८४ मधील दंग्यावर आधारित हा चित्रपट आहे. १९८४ च्या दंगलीत शीख बांधवांचा मृत्यू झाला होता.
मद्रास कैफे (2013)
या चित्रपटाची स्टोरी इंदिरा गांधी यांच्यावर आधारित नाही परंतू त्यांचे पुत्र माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, नरगिस फाखरी, रिषि खन्ना, सिद्धार्थ बसु आणि प्रकाश बेलावदी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
31 अक्टूबर (2016)
इंदिरा गांधी यांची हत्या आणि त्यानंतरच्या परिस्थितीवर ३१ अक्टूबर हा चित्रपट २०१६ मध्ये आला. या चित्रपटावरून देखील खूप चर्चा झाली. चित्रपटात सोहा अली खान आणि वीर दास ने मुख्य भूमिका केली आहे.
इंदू सरकार
२०१७ मध्ये इंदू सरकार हा चित्रपट आला. त्यात इंदिरा गांधी यांच्या काळातील आणीबाणीवर भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटात कीर्ती कुलकर्णी आणि विकी कौशल यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.