तब्बल दोन वर्षानंतर श्रीराम रथ यंदा जल्लोषात निघणार 

महापालिकेतर्फे धुतला रथ ; १४९ वर्षांची परंपरा

जळगाव- शहरातील जुन्या गावातील रामपेठ परिसरातील श्रीराम मंदिर म्हणजे जळगावकरांचे ग्रामदैवत. संस्थानतर्फे वर्षभर विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. पण, या धार्मिक उत्सवांतील सर्वांत मोठा उत्सव आणि १४९ वर्षांची परंपरा लाभलेला रथोत्सव. तब्बल दोन वर्ष कोरोनामुळे जागेवरच पाच पाऊले फिरणारा रथ यंदा कार्तिक प्रबोधिनी एकादशीला मोठ्या उत्साहात काढला जाणार आहे. आज महापालिकेतर्फे रथ अग्निशमन बंबाद्वारे धुण्यात आला. 

रथोत्सव जळगांव नगरी श्रीराम रथोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. दि. १५ रोजी पहाटे ४.०० वा. काकडारती प्रभु श्रीरामांच्या उत्सवमुर्तीस महाअभिषेक सकाळी ७.०० वाजता महाआरती, सकाळी ७.३० ते ८.३० सांप्रदायिक पंचपदी भजन. त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात सकाळी १०.३० वाजता श्रीराम रथाचे महापुजन, वंशपरंपरेने श्रीराम मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त व विद्यमान गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांचे हस्ते शहरातील समस्त ब्रह्मवृंद मंडळी यांचे वेदमंत्र घोषात होईल. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजुमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, आयुक्त सतिष कुळकर्णी, उपायुक्त श्याम गोसावी, श्रीकांत खटोड, खा. उन्मेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहे. तसेच श्रीराम मंदिर संस्थानचे समस्त विश्वस्त मंडळी, श्रीराम रथोत्सव समितीचे अध्यक्ष अजयोत्तम पाटील, कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, दत्तात्रय चौधरी, सदस्य भालचंद्र पाटील, भानुदास चौधरी, विलास चौधरी, दादा नेवे, शिवाजी भोईटे, सुजीत पाटील, दिलीप कुळकर्णी, तसेच रथोत्सवाचे मानकरी, सेवेकरी यांच्या उपस्थितीत प्रारंभ होईल. ह.भ.प. मंगेश महाराजांचे हस्ते श्रीराम रथाची महाआरती होवून संस्थान तर्फे उपस्थित प्रमुख पाहुणे व रथोत्सवाचे मानकरी सेवेकरी यांचा सत्कार करण्यात येईल.

अशी असेल उत्सवमूर्ती 

रथावर आरुढ होणारी प्रभु श्रीरामचंद्रांची उत्सव मुर्तीची आरती होवून रथावर स्थानापन होईल. रथावर गरुड, मारुती, अर्जुन व दोन लोकडी घोडे इ. मुर्त्या तसेच राथावर झेंडुच्या पुष्पहारांनी सजवलेला श्रीराम रथ मिरवणुकीस प्रभु श्रीरामांच्या जय घोषात प्रारंभ होईल. रथाचे अग्रभागी सनई, नगारा, वादन, चौघडा गाडी. झेंडेकरी, बँड पथक, वारकरी सांप्रदायिक भजनीमंडळ, श्री संत मुक्ताबाईंच्या पादुका असलेली पालखी व त्यामागे श्रीराम रथ अशा भव्य दिव्य मिरवणुकीस सकाळी ११.०० वाजता श्रीराम मंदिर येथुन प्रारंभ होईल.

रथाचा असा राहील मार्ग

कोल्हे वाडा, आंबेडकर नगर, चौधरी वाडा, तेली चौक, मंदिराचे मागील गल्लीतुन रथ चौक, बोहरा गल्ली, सुभाष चौक, दाणा बाजार, दि पीपल्स् बँक, शिवाजी रोड, नेवे ब्रदर्स, घाणेकर चौक, गांधी मार्केट, सुभाष चौक मार्गे सराफ बाजारातील श्री महालक्ष्मी मंदिर येथे भजनाचा कार्यक्रम होवून. अंबु रावजी कासार, श्री मरिमाता मंदिर, भिलपुरा मार्गे भिलपुरा येथील श्री संत अप्पा महाराजांचे परम मित्र श्री संत लालशा बाबा यांचे समाधि येथे रथ थोडा वेळ थांबवून श्री संत लालशा बाबा यांचे समाधिवर पुष्पचादर अर्पण करुन दधिची चौक मार्गे बालाजी मंदिर, रथ चौकात रात्री १२.०० वाजता रथ येईल. प्रभु श्रीरामांचे उत्सव मुर्तीस पालखीत ठेवुन वाजत गाजत श्रीराम मंदिरात आणण्यात येईल रात्री प्रभु श्रीरामांची महाआरती होवुन श्रीराम रथ यात्रेची सांगता होईल.

हे घेत आहेत परिश्रम

यशस्वीतेसाठी संस्थानचे विश्वस्त मंडळ शिवाजीराव भोईटे, श्रीराम रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, सचिव दिलीप कुळकर्णी, सदस्य भानुदास चौधरी, दत्तात्रय चौधरी, विलास चौधरी, भालचंद्र पाटील, सुजीत पाटील, पितांबर चौधरी, दिगंबर खडके, मुकुंदा पाटील, अरुण मराठे, दिलीप खडके, देविदास बारी, अविनाश येवले, किशोर नाटेकर, मुकुंद धर्माधिकारी, नंदु शुक्ल, महेंद्र जोशी, सुधाकर कुळकर्णी, विकाश शुक्ल, मुकुंद शुक्ल, तानाजी बारी, जगन्नाथ बारी, शंकर चौधरी, घनश्याम चौधरी, नारायण फेगडे, मधुकर चौधरी, कवि कासार, संजय कोरके, सुनिल पाटील, यशवंत खडके, दिनेश धांडे,राजेंद्र काळे, व समस्त श्रीराम भक्त, मानकरी, सेवेकरी मंडळींनी परिश्रम घेत आहेत.