इन्फोसिसच्या सीएफओचा राजीनामा!

0

नवी दिल्ली- इन्फोसिसचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) एम.डी.रंगनाथ यांनी कार्यकारी पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात ‘रंगनाथ यांनी दिलेला सीएफओ आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी पदाचा राजीनामा संचालक मंडळाने स्वीकारला आहे. ते १६ नोव्हेंबरपर्यंत या पदावरच असतील. मंडळ लवकरच पुढील सीएफओची नियुक्ती करेल.’ असे सांगण्यात आले आहे.