सातारा : धनंजय मुंडे यांच्या हट्टामुळे विधान परिषदेची जागा भाजप मधून आलेले रमेश कराड यांना दिली असे बोलले जात आहे. मात्र हे खोटे आहे. मुंडेंनी रमेश कराड यांना उमेदवारी देण्याबाबत कोणताही हट्ट धरला नव्हता. त्यांचे मत वेगळे होते. तसेच त्यांना धक्का बसला हे जे सोशल मिडियात येतय तो त्यांच्यावर अन्याय आहे, असे मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपवर उमेदवार पळवा पळवीची वेळ का आली, असा प्रश्न शरद पवार यांना विचारला त्यावर ते म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या हट्टामुळे आम्ही त्यांना जागा दिली हे साफ खोटे आहे. त्यांचे मत वेगळे होते. त्यांना धक्का बसला हे जे सोशल मिडियात येतय तो त्यांच्यावर अन्याय आहे.
परभणीची जागा राष्ट्रवादीची होती. मात्र, ही एकाच जिल्ह्यातील निवडणूक होती. पण बीडची जागा तीन जिल्ह्यातील असल्याने निवडणुकीपूर्वी तेथे पोहोचता येईल म्हणून थोडेसे धाडस म्हणून आम्ही आम्ही ती जागा घेतली. आर्थिक ताकद नसल्याने मी लढू शकत नाही, असे सांगून येथील उमेदवाराने माघार घेतली, असे पवारांनी स्पष्ट केले.