आज दि 11सप्टेंबर रोजी ईनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीने भुसावळ मिलिटरी स्टेशन ,ऑर्डिनन्स फॅक्टरी जवळ येथे जाऊन लष्करी अधिकारी व जवान यांना राखी बांधली .आपले भारतीय सैन्य आपली सुरक्षा करते म्हणूनच आपण सुखी आणि शांततेत जीवन जगू शकतो म्हणून आपले सुद्धा कर्तव्य आहे की रक्षाबंधन त्यांचे सोबत साजरे करून त्यांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे या भावनेतून क्लबने हे रक्षाबंधनाचे नियोजन केले .या प्रसंगी क्लब सदस्यांचे मिलिटरी स्टेशन चे कर्नल चिन्गाप्पा यांनी स्वागत केले .ऊपस्थित सर्व अधिकारी आणि जवान यांना क्लब सदस्यांनी राखी बांधली .या वेळी धार्मिक व भावूक वातावरण तयार झाले होते . या कार्यक्रमासाठी अध्यक्ष रेवती मांडे ,सचिव सीमा सोनार ,सुनीता पाचपांडे,मोना भंगाळे,अदिती भडंग,कविता पाचपांडे,मीनाक्षी धांडे ,हेमलता सोनार ,विनीता नेवे या सदस्यांनी सहभाग घेतला .