‘जीपीएस’ मित्र परिवाराचा अभिनव उपक्रम!  गरजवंतांना दिली मायेची उब

प्रजासत्ताक दिनी चिमुकल्यांना चाॅकलेट तर निराधारांना कपडे, ब्लॅंकेटची भेट

पाळधी ता, धरणगाव, वार्ताहर – यंदा भारत देश आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. २६ जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी खूप खास आणि महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस लोकशाही पद्धतीने आपले सरकार निवडण्याची भारतीय नागरिकांची शक्ती प्रतिबिंबित करतो. भारताच्या इतिहासात हा दिवस अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. त्यामुळेच हा दिवस देशभरात आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो.

 

याचे अवचित साधत पाळधी येथे जीपीएस मित्र परिवाराच्या वतीने ध्वजारोहणाकरिता गावातील विविध ठिकाणी विद्यार्थी हे प्रभात फेरी च्या माध्यमातून जात असतात या प्रभात फेरीमध्ये सहभागी असलेल्या व शाळेतील विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले तसेच परिसरातील रस्त्याने फिरत असणाऱ्या अश्याना अन्न वस्त्र निवारा नाही अश्या निराधार भटक्या गरजूंना कपडे व ब्लॅंकेट वाटप केले, तसेच जळगाव कडे व धरणगाव- एरंडोल कडे जाण्याचा मार्गावर म्हणजेच गावाच्या दोघे बाजूच्या मुख्य रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रकारच्या कौतुकास्पद उपक्रम राबवत जीपीएस मित्र परिवाराने गणराज्य दिन साजरा केला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, लोकनियुक्त सरपंच विजय पाटील, यासह जीपीएस मित्र परिवाराचे सर्व सदस्य, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. जीपीएस मित्र परिवाराच्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.