कुही तालुक्यातील चाफेगडी, मोहगाव, चीचघाट, मौदा तालुक्यातील वडना, मोहखेडी, पावडदवना आदी ठिकाणी भेटी देऊन अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी
नागपूर जिल्ह्यात नागपूर तालुक्यातील अड्याळी, उमरगाव, उमरेड तालुक्यातील पाचगाव, चांपा, गावसुत, कुही तालुक्यातील चाफेगडी, मोहगाव, चीचघाट, मौदा तालुक्यातील वडना, मोहखेडी, पावडदवना आदी ठिकाणी भेटी देऊन अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ठिकठिकाणी शेतकरी बांधवांशी संवाद साधला तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी विविध मागण्यांची निवेदने स्वीकारली.
सोयाबीन पिकावर पडलेल्या ‘Yellow Mozac’ अळीमुळे झालेले नुकसान तसेच अन्य नुकसानीबाबतचे पंचनामे तसेच एसडीआरएफ व एनडीआरएफ च्या निकषानुसार अतिवृष्टी बाधित क्षेत्रास सहाय्यक अनुदान व पीकविमा मिळणेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले.
यावेळी खा. कृपाल तुमाने, आ.टेकचंद सावरकर, आ.राजू पारवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, मा.आ.सुधीर पारवे, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांसह संबंधित विविध विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
– धनंजय मुंडे