भाजप नेत्यांचे दलितांच्या घरी जाणे हा दलितांचे अपमान

0

बहराइच- जाती व्यवस्था नष्ट झालेली आहे असे म्हणतात तर भाजप नेते दलितांच्या घरी जाऊन जेवण करतात व ते फोटो सोशल मिडीयावर पसरवितात. आम्ही दलितांच्या घरी गेलो तेथे जेवलो असे प्रचार का करतात असा प्रश्न उपस्थित करत भाजप नेते हे दलितांच्या घरी जाऊन दलितांचा अपमान करत आहे असा घरचा आहेर भाजपा खासदार सावित्रीबाई फुले यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशातील  बहराइच लोकसभा मतदार संघातून भाजपकडून त्या लोकसभेवर निवडून गेलेल्या आहेत.

दलितांच्या घरी जेवणाला जातात मात्र त्या ठिकाणी जेवण तयार करणारे दुसरे असतात, जेवण तयार करण्यासाठी लागणारे भांडे देखल बाहेरून आणले जातात, जेवण वाढणारेव दुसरे असतात असे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाना साधला आहे. दलितांच्या घरी त्यांच्या समस्या जाणण्यासाठी गेल्यास त्यांच्या समस्या काय आहे हे तुम्हाला कळेल असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.