भुसावळ l भुसावळ येथील मुळ रहिवासी अमित चुडामण पाटील यांनी पुणे येथे गृह कर्ज बँकेतून घेतले व या गृहकर्जातून घर खरेदी केले. या गृहकर्जाला विमा संरक्षण होते व विमा पॉलिसी घेतांना अमित पाटील यांनी विमा कंपनीला मोबदला दिला होता. दुर्देवाने अमित पाटील यांची पुणे येथे अपघाती मृत्यू झाली. यानंतर त्यांची पत्नी प्रिया अमित पाटील ही मयत अमित पाटीलची कायदेशीर वारस व विमा पॉलिसीत नॉमिनी असल्याने विमा नुकसान भरपाई रक्कम मागणीसाठी एच.डी.एफ.सी. विमा कंपनीकडे अर्ज सादर केले. एच.डी.एफ.सी. विमा कंपनीने प्रिया अमित पाटील यांना मयताचे अपघाती मृत्यू बाबतचे पोलीसांचा अंतिम तपास अहवाल व जिल्हाधिकारी तथा तहसिलदार यांचा वारस दाखला 07 दिवसांचे आत दाखल करणेबाबत कळविले. प्रिया अमित पाटील यांनी सदरील कागदपत्र दाखल करण्यास मुदत वाढ मागितली. त्यानंतर दुर्देवाने दि. 24/08/2018 रोजी प्रिया पाटील यांची मृत्यू झाली. यानंतर ऑक्टोबर 2018 मध्ये बँकेने अमित पाटील यांचे नावाचे घर त्रयस्थ इसमाला विक्री केली व याबाबत मयताचे वारसांना कोणतीही सुचना दिली नाही तसेच घर विकी केल्यानंतर मिळालेले लाभ मयताचे इतर वारस म्हणजे अमित पाटील यांचे आईवडील यांना दिले नाही. घर विकी बाबत लाभ मिळाला नाही विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळाली. नाही या कारणाने व्यथित होवून अमित पाटील यांचे आईवडील नामे विद्या चुडामण पाटील व श्री चुडामण पाटील हे वयोवृध्द व ज्येष्ठ नागरीक असतांना या अन्यायाबाबत व्यथित होवून दिमा लोकपाल पुणे यांचे समोर में 2022 ला विमा नुकसान भरपाई रक्कम रू 24,67,689/- मिळणेसाठी दावा दाखल केला. सदरील दाव्याची सुनावणी मा. विमा लोकपाल पुणे यांनी 18 एप्रिल 2023 ला सुनावणी घेतली. या सुनावणी दरम्यान एच.डी.एफ. सी. विमा कंपनीने असा बचाव घेतला की, मयताची अपघाती मृत्यू नाही आत्महत्या आहे…. अर्जदार यांनी दस्तावेज सादर केले नाही पोलीसांच्या अंतिम अहवाल सादर केला नाही वारस प्रमाणपत्र सादर केले नाही व विमा पॉलिसीची अटी शर्ती भंग केली तसेच कायदेशीर मुदतीत दोन वर्षात सदरील दावा दाखल केला नाही. यावर विमा लोकपाल यांनी आपले निष्कर्ष नोंदविले की, मयताची अपघाती मृत्यू झाली आहे याबाबत पोलीसाचा अहवाल अभिलेखावर असल्याने अपघाती मृत्यू झाली आहे हे सिध्द झाले आहे विमा कंपनीन आपले बचावासाठी कोणतेही दस्तऐवज सादर केले नाही व सदरील दावा हा अपवादात्मक असल्याने विमा लोकपाल विलंब माफ करीत आहे. कारण प्रिया पाटील यांची मृत्यू झाल्यानंतर दोन वर्ष कोरोना संसर्गजन्य पार्श्वभूमीवर संपुष्टात आले व अर्जदार हे वयोवृध्द व ज्येष्ठ नागरीक असल्याने यांना मुदतीत दाव्याबाबत आवश्यक दस्तऐवज मिळाले नसल्याने विलंब माफ करणे गरजेचे आहे. असे निष्कर्ष नोंदवून विमा कंपनीला नुकसान भरपाई रक्कम रू. 24,67,689/- देण्यास जबाबदार धरले व सदरील रक्कम 30 दिवसांचे आत श्रीमती विद्या चुडामण पाटील मयताची आई यांना देण्यात याव े. 30 दिवसांचे आत रक्कम न दिल्यास सदरील रक्कमेवर दावा नामंजूर झाल्याचे तारखेपासून बँक दरापेक्षा 2 टक्के अधिक व्याजासह रक्कम फिटेपावेतो दयावे लागणार असे आदेश विमा लोकपाल अधिनियम 2017 नियम 16, 17 अन्वये दि. 30/05/2023 रोजी पारीत करण्यात आला. या प्रकरणात श्रीमती विद्या पाटील व चुडामण पाटील यांना प्रकरण बाबत अॅड. राजेश एस. उपाध्याय, भुसावळ व अॅड. तुषार एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले.