जन-धन खातेधारकांना बिनव्याजी पाच हजाराची मदत

0

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या जन-धन योजनेमधील खातेधारकांना व्यवसाय करण्याकरिता विना व्याजाच कर्ज मिळणार आहे. यामध्ये पाच हजार रुपये पर्यंतची मदत दिली जाणार आहे. हे कर्ज विना व्याज फक्त २४ तासांकरिता असणार आहे. अशी माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

या योजनेमधील खातेधारकाने पाच हजार रुपयापर्यंतचे कर्ज घेतले व त्याने २४ तासाच्या आत परत केले तर त्याला विना व्याज हे कर्ज उपलब्ध असेल. जर घेतलेली रक्कम वेळेमध्ये भरली नाही तर नियमानुसार व्याज आकारले जाईल.