पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार

0

पुणे :- पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी शासनाने मान्यता दिली असून शासनाने 3513 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. बुधवारी (9 मे) याबाबतचा अहवाल शासनाने काढला असून पुरंदर येथेच आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनास मान्यता देण्याबरोबरच शासनाने वित्तीय मान्यता सुध्दा दिली आहे. विमानतळासाठी 2 हजार 367 हेक्‍टर जागेची आवश्‍यकता असून भूसंपादनासाठी शासनाने 3 हजार 513 कोटींच्या खर्चासही मंजुरी दिली आहे. पुरंदर तालुक्यातील एखतपूर, खानवडी, पारगाव, वनपुरी, मुंजवडी आणि उदाचीवाडी या सात गावातील 2367 हेक्टर जमिनीसाठी 2 हजार 713 कोटी आणि फळझाडे, तलाव, विहिरी यासाठी अंदाजे 800 कोटी रुपये अपेक्षित खर्च असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुरंदर येथे विमानतळ उभारण्यावर शासनाने शिक्कामोर्तब झाले आहे.