आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ

0

वाशिंग्टन- गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी रूजू झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्वोच्चपदी नियुक्त होणाऱ्या गोपीनाथ या पहिल्या महिला आहेत आणि तो भारतीय महिलेला मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुखपद याआधी रघुराम राजन यांनीही बजावले असून ही मान प्राप्त करणाऱ्या गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत.

मैसूरमध्ये जन्म झालेल्या गोपीनाथ हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रोफेसर होत्या. तसेच त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत कार्यरत होत्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं एक ऑक्टोबर रोजी त्यांची नियुक्ती जाहीर करताना गीता गोपीनाथ या जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या अर्थतज्ज्ञ असल्याचे व त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड अनुभव असल्याचे गौरवोद्गार काढले होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये त्यांनी चांगले नेतृत्वगुण दाखवले असून त्या जगभरातील महिलांसाठीही एक आदर्श असल्याचे आवर्जून नमूद करण्यात आले आहे.