आंतरराष्ट्रीय खेळाडू परविंदर चौधरीची आत्महत्या

0

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय खेळाडू परविंदर चौधरीने दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज बुधवारी घडला. गोंडा येथील कॅमथल थाना येथील परविंदर हा जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील अॅथलीट अकादमीत राहत होता.

सोमवारी सकाळी वडिलांशी त्याचे फोनवर भांडण सुरू झाले होते. त्यानंतर त्याची बहीण येथे आली होती आणि तिने त्याच्याशी चर्चा केली होती. दुर्दैवाने आम्ही त्याला वाचवू शकलो नाही,”अशी माहिती भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने दिली.