भोळे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न

भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त *योग वेलनेस सेंटर अंतर्गत *दिनांक 21 जून 2023 रोजी योग प्रोटोकॉल कार्यक्रम* महाविद्यालयात आयोजित करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजू फालक सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते यावेळी योग शिक्षक प्रा डॉ दयाधन राणे यांनी पूरक व्यायाम

*बैठक स्थिती मधील आसने*

सहजासन, वज्रासन

शरणागत मुद्रा, शशांकासन, मंडूकासन

*दंड स्थिती मधील आसने*

ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, विरासन

*विपरीत शयन स्थितीमधील आसने*

भुजंगासन, शलभासन, धनुरासन

*श्वसन प्रकार आणि प्राणायाम* याचे प्रात्यक्षिक करून घेतले

कार्यक्रमाचे आयोजनसाठी योग वेलनेस सेंटर समिती प्रमुख प्रा डॉ संजय चौधरी प्रा आर डी भोळे, प्रा जगदीश चव्हाण, प्रा संगीता धर्माधिकारी प्रा अनिल सावळे प्रा अनिल नेमाडे, श्री दीपक महाजन, प्रकाश सावळे, राजेश पाटील, विजय पाटील यांनी परिश्रम घेतले